कर न भरणारे कराच्या कक्षेत, ‘अभय योजना’ जाहीर

July 20, 2016 6:23 PM0 commentsViews:

मुंबई, 20 जुलै : व्यवसाय करत असूनही कर न भरणार्‍यांना कराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय राज्य सरकरानं घेतलाय. यासाठी सरकारने `अभय योजना` जाहीर केलीय. कर भरण्यास पात्र असूनही ज्यांनी आपली नोंदणी केली नाही त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी असं आवाहन विक्रीकर विभागाने केलंय.abhya_yokjan

संस्था, व्यक्ती, कार्यालये, कारखाने अशा सर्वांना हा नियम लागू आहे. 30 सप्टेंबरपर्यंत जे नाव नोंदणी करणार नाहीत त्यांच्या विरोधात धडक मोहिम राबवणार असल्याचा इशारा विक्रीकर विभागाने दिलंय. नाव नोंदणी ऑनलाईन करता येणं शक्य नसून त्यासाठी कुठलेही कागदपत्र द्यावे लागणार नाहीत. फक्त पॅन कार्ड आणि इतर माहिती दिल्यास नाव नोंदणी करता येणार आहे.

काय आहे अभय योजना ?

- महिन्याला 7 हजार 500 रुपयांपेक्षा जास्त कमाई असणार्‍यांनी विक्रीकर लागू
– अशा सर्वांसाठी 30 सप्टेंबर 2016 पर्यंत नोंदणी आवश्यक
– नोंदणी केल्यास 1 एप्रिल 2013 पूर्वीचा कर आणि दंड माफ
– नोंदणी न केल्यास सप्टेंबरनंतर धडक करावाई
– दोषींकडून मागच्या आठ वर्षांच्या करासहीत व्याज आणि दंड आकारणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close