तलवारीचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार

July 20, 2016 7:21 PM0 commentsViews:

rape_case_mumbaiपरभणी, 20 जुलै : राज्यातील बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच परभणीत चक्क तलवारीचा धाक दाखवून एक 35 वर्षांच्या महिलेवर एका तरुणानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. परभणीच्या भीमनगरमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी घटना घडताच तात्काळ आरोपीला अटक केलीय.

भीम नगर इथं राहणारी विवाहीत महिला काम करून घरी परतली आणि भाजी आणण्यासाठी बाहेर पडली तेव्हा मोहन गुजर या तरूणानं या महिलेनं तलवारीचा धाक दाखवून तीला उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कुणालाही न सांगण्याची धमकी ही या तरुणाने दिली. परंतु परिसरातील नागरिकांनी आणि घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ही या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपी मोहन गुजर याला बेड्या ठोकल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close