दोन, तीन अंकी लॉटरीवर बंदी

April 7, 2010 3:12 PM0 commentsViews: 1

7 एप्रिल राज्यात दोन आणि तीन अंकी लॉटरीवर उद्यापासून बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची घोषणा अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी केली आहे. केंद्रसरकारने एक एप्रिलपासून अशा लॉटरीला बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या नियमांचा भंग होऊ नये, यासाठी राज्यसरकारनेहा निर्णय घेतला आहे. तसेच आतापर्यंत झालेल्या लॉटरीच्या तिकीटांच्या विक्रीचा परतावा खरेदी करणार्‍यांना दिला जाईल, असेही तटकरे यांनी विधान परिषदेत जाहीर केले.

close