‘मराठी शाळा बंद पडू देणार नाही’

April 7, 2010 3:38 PM0 commentsViews: 28

7 एप्रिल राज्यातील एकही मराठी शाळा बंद पडू देणार नाही, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली. मुंबईतील ब्रीचकँडी परिसरातील पामबीच आणि न्यूइरा या शाळा बंद करून तिथे शॉंपिंग मॉल्स उभारण्याची परवानगी राज्य सरकार देत असल्याची गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केला. यामागे मोठा घोटाळा असल्याचा आरोप करत मुंबई आणि राज्यातल्या शाळा बंद करण्याचा घाट सरकार घालत असल्याचे ते म्हणाले.Öêया लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्र्यांनी ही घोषणा केली.

close