सतीश शेट्टी हत्येप्रकरणी आंधळकर आणि कवठाळेंना जामीन

July 20, 2016 9:12 PM0 commentsViews:

satishshetty_andhalkar20 जुलै : सतीश शेट्टी हत्येप्रकरणी सीबीआयला मोठा झटका बसलाय. भाऊसाहेब आंधळकर आणि नामदेव कवठाळेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आंधळकर आणि कवठाळे हे दोघंही माजी पोलीस अधिकारी असून 2010 साली सतीश शेट्टी यांची तळेगावमध्ये भरदिवसा हत्या झाली होती.

आंधळकर हे शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाचा सुरुवातीला तपास करत होते. सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात आंधळकर हे स्वत: सहभागी होते असा सीबीआयला दाट संशय आहे. 2010 मध्ये सतीश शेट्टी यांची तळेगाव दाभाडेमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सहावर्षांनंतर भाऊसाहेब आंधळकरांना अटक झाली होती. सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनी अनेकदा आंधळकर यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close