करतो, करू, अशी उत्तरं देऊ नका, खडसेंनी बडोलेंना खडसावलं

July 20, 2016 9:28 PM0 commentsViews:

20 जुलै : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज सरकारलाच खडसावलं. ओबीसींच्या मुद्द्यावरून खडसेंनी त्यांच्याच सरकारला फैलावर घेतलं. नॉन क्रिमी लेअरची मर्यादा वाढवणार होतात, त्याचं काय झालं. करतो, करू, अशी उत्तरं देऊ नका, कधी करताय ते स्पष्ट सांगा, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी आपल्याच पक्षातील मंत्र्यांना सुनावलं.khadse_latur

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, तसेच शिक्षण फी आणि परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेसंदर्भात लक्षवेधी यांनी मांडली. लोकांना करतो, करू अशी उत्तर देऊ नका, ठोस उपाययोजना करून कधी करणार ते स्पष्ट करा असं सांगत आपल्याच पक्षातील मंत्र्यांला फैलावर घेतले. त्यावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंनी लगेच आश्वासन दिलं. शैक्षणिक प्रवेशासाठी इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या नॉनक्रिमिलेअरसाठीची उत्पन्न मर्यादा अधिवेशन संपण्यापूर्वीच साडेचार लाखावरून सहा लाख एवढी करण्यात येईल, तसंच ज्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रतिपूर्ती झाली नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी प्रवेश देण्यात यावेत अशा सूचना संबंधित महाविद्यालयाला देण्यात येतील असं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close