राहुल गांधी काल झोपले, आज पीडितांना भेटले

July 21, 2016 1:32 PM0 commentsViews:

गुजरात, 21 जुलै : गुजरातमध्ये गायींची हत्या केल्याच्या आरोपावरुन दलितांना मारहाणीच्या घटनेनं पुन्हा एकदा देश ढवळून निघालाय. काल लोकसभेत या संवदेनशील घटनेवर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी चक्क झोपले होते. आणि आज राहुल गांधी याच प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहचले आहे. त्यांच्या या दुहेरी भूमिकेमुळे सोशलमीडियावर संताप व्यक्त होत आहे.rahul_gandhi_una

ज्यावेळेस एखाद्या कमजोर माणसावर, संस्थेवर अत्याचार होत असतो त्यावेळेस मात्र आजुबाजुला उभी असलेली पब्लिक नुस्तीच उभी असते. पण ती घटना घडून गेली की पीडितांना भेटण्यासाठी रांग लागते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सौराष्ट्रातल्या उनात पोहोचले. ज्या दलितांना तथाकथित गोरक्षावाल्यांनी मारहाण केली त्या पीडितांना राहुल गांधी भेटलेत. त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतलीय आणि विचारपूस केलीय.

विशेष म्हणजे काल अशाच गंभीर विषयावर लोकसभेत चर्चा सुरू असताना मात्र राहुल गांधी झोपलेले होते. त्यावरून कालपासून मोठा गदारोळ सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींची गुजरात भेट ही काँग्रेसची वरवरची चलाखी असल्याची टीका सोशल मीडियावर सुरू झालीय. राहुल गांधींचा दौरा म्हणजे निव्वळ पर्यटन असल्याची टीका भाजप नेते मुक्तार अब्बास नकवी यांनी केलीये.

आनंदीबेन पटेलही भेटीला

गुजरातमधल्या उना इथं दलितांवर झालेल्या अत्याचारामुळे भाजप अडचणीत आलाय. तसंच यावरून राजकारणही तीव्र झालंय. आगामी उत्तर प्रदेश निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप डॅमेज कंट्रोल मोडमध्ये आहे. काल मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी दलितांची भेट घेतली. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या गुजरातला जाणार आहेत. मात्र, ही सर्व धडपड दलित मतांसाठी असल्याची टीका होतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close