पाच राज्यात निवडणुकांचा बिगुल, जम्मू-काश्मीरला वगळलं

October 14, 2008 10:29 AM0 commentsViews: 33

14 ऑक्टोंबर, दिल्लीदेशातील पाच राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगानं जाहीर केला. छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, मिझोराम आणि मध्यप्रदेशमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी पत्रकार परिषदेत या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार मध्यप्रदेशात 25 नोव्हेंबर, दिल्ली आणि मिझोराममध्ये 29 नोव्हेंबरला छत्तीसगढमध्ये 14 आणि 20 नोव्हेंबरला तर राजस्थानात 4 डिसेंबरला निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकांची मतमोजणी 8 डिसेंबरला होईल. अधिकार्‍यांना निवडणुकीच्या तयारीचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी 650 निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. नोव्हेंबरपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये मात्र अद्याप निवडणुकांची तारीख जाहीर झालेली नाही. जम्मू आणि काश्मिरातील काही बाबींची पुर्तता केल्यावर कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

close