काय आहे दलित गुजरात उना दलित मारहाण प्रकरण ?

July 21, 2016 1:55 PM0 commentsViews:

गुजरात, 21 जुलै : गायींचं मास घरात ठेवल्याच्या आरोपावरुन उत्तरप्रदेशमध्ये अखलाखची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष अजून लागला नाही तेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्येच स्वत:ला गोरक्षक म्हणून मिरवणार्‍यांनी दलित तरुणांना बेदम मारहाण केली. या प्रकरणाचे गल्ली ते दिल्ली पडसाद उमटत आहे.una_case

गुजरातच्या उना इथं मेलेल्या गायीचं चामडं काढणार्‍या दलित युवकांना गोरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली होती. मेलेल्या जनावरांची कातडी काढून ती विकणं हा या दलितांच्या उदरनिर्वाहाचा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र, त्यांनी गायी मारल्या असा आरोप करून या स्वयंघोषित गोरक्षकांनी त्यांना जबर मारहाण केली होती.

यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागल्यामुळे भाजपला याची दखल घेणं भाग पडलं. विशेष म्हणजे मारहाण झालेल्यापैकी एका तरुणाला घर रिकामं करण्याची नोटीस ही मारहाण होण्यापूर्वी गावच्या सरपंचानं बजावली होती. दरम्यान,

उना इथं घडलेल्या दलित अत्याचार प्रकरणानंतर गुजरातमध्ये अजूनही तणावाचं वातावरण आहे.  मारहाण झालेल्या दलित तरुणांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर या तरुणांवर सोमनाथमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गुजरातमध्ये दलित संघटनांची निदर्शनं सुरू आहेत. या प्रकरणातल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी दलितांमधून केली जातेय.

व्हिडिअो पाहा – दलित तरुणांना भररस्त्यावर बेदम मारहाण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close