दयाशंकर सिंहला अटक करा, बसपा कार्यकर्ते उतरले रस्त्यावर !

July 21, 2016 2:11 PM0 commentsViews:

21 जुलै : बसपाच्या अध्यक्षा मायावतींविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याच्या निषेधार्थ लखनौमध्ये बसपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. सकाळपासून ठिकठिकाणी बसपाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं सुरू केलीये. संतप्त बसपा कार्यकर्त्यांनी यावेळी जाळपोळही केली.
शिवाय पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही फेकून देण्याचा प्रयत्न केला.bsp_23423

भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या दयाशंकर सिंहला तातडीनं अटक करावी अशी मागणी आंदोलकांनी केलीये. भाजप नेते दयाशंकर सिंह यांनी पक्षात जागा देण्यासाठी लाच घेतात, त्यांचं चारित्र्य XX सारखं आहे अशी असभ्य टीका दयाशंकर सिंह याने केली होती. या टीकेमुळे संसदेत याचे तीव्र पडसाद उमटले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पक्षाच्या वतीने मायावतींची जाहीर माफी मागितली. तसंच दयाशंकर सिंहची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीये. मात्र, बसपा कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. लखनौमध्ये बसपच्या कार्यकर्त्यांनी दयाशंकर सिंह यांच्याविरोधात निदर्शनं केली. लखनौमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ही निदर्शनं करण्यात आली.

दयाशंकर सिंहविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, बसपाचे नेते नईमुद्दीन सिद्दीकी यांनी दया शंकर सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केलीये. लखनौमधल्या पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात बसपचे कार्यकर्ते उपस्थित होते. बसपच्या प्रमुख मायावती यांच्याविरोधात दयाशंकर सिंह यांनी अपशब्द वापरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविरोधात प्रचंड रोष आहे. दरम्यान, दयाशंकर सिंह यांना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close