‘दलित कार्ड’ मोदींना महागात पडणार !

July 21, 2016 3:02 PM0 commentsViews:

21 जुलै : मोदींनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला तोच उत्तर प्रदेशातल्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन…त्यात 19 मंत्र्यांपैकी 5 मंत्री हे दलित आहेत. याचाच अर्थ उत्तरप्रदेशातल्या दलित मतांवर डोळा ठेवत हा निर्णय मोदींनी घेतलेला. पण ह्याच निर्णयावर पाणी फिरत असल्याचं सध्या दिसतंय. त्याला कारण ठरल्यात त्या तीन घटना. गुजरातमध्ये दलित तरूणांना केलेली मारहाण, मुंबईतलं आंबेडक भवन पाडलं जाणं आणि तिसरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या उपाध्यक्षानं मायावतींची तुलना सेक्स वर्करशी करणं…

narendra modiएक तर रोहित वेमुला प्रकरणात भाजपाचे हात पोळलेले होते. त्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न मंत्रीमंडळ विस्तारात झाला पण आता पुन्हा गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं दलित रस्त्यावर उतरलेत तसच मुंबईत दोन दिवसांपुर्वी आंबेडकर भवन पाडण्याच्याविरोधात जी गर्दी मुंबईनं पाहिली ती भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.

विशेष म्हणजे मायावतींविरोधात वक्तव्य करणार्‍या दयाशंकरसिंह यांना भाजपानं घरचा रस्ता दाखवलाय पण गुजरात आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं भाजपाच्या सरकारांनी प्रतिसाद दिला त्यावर मोदी फार समाधानी नसल्याचं दिसतंय. राजनाथ सिंग यांनीही संसदेत त्याचे संकेत दिलेत. दरम्यान, आता राहुल गांधी आज गुजरातमध्ये उणात जाऊन पीडितांची भेट घेणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही जाण्याची शक्यता आहेत. त्यामुळे मोदींना त्यांच्या घरच्या मैदानावरच सध्या आव्हान दिलं जातंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close