घरगुती वादातून पतीने पत्नीसह मुलीची केली हत्या

July 21, 2016 12:02 PM0 commentsViews:

पंढरपूर, 21 जुलै : पंढरपूरमध्ये पतीने पत्नीसह पाच वर्षांच्या मुलीची डोक्यात रॉड मारुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये.. पंढरपूर तालुक्यातल्या रोपळे गावातली ही घटना आहे. प्रशांत वट्टमवर असं आरोपीचं नाव आहे. घरगुती वादातून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.crime scene

हत्या केल्यानंतर आरोपी प्रशांत वट्टमवार स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यांने हत्येची कबुली दिलीय. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय. प्रशांत हा रोपळे गावात टेलरिंग आणि मोबाईल दुरूस्तीचं काम करत होता. हत्येच्या रात्री प्रशांतचा पत्नीशी मोठा वाद झाला. आणि या वादातूनच प्रशांतने पत्नी आणि मुलीची हत्या केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close