स्वप्नील सोनावणे हत्येप्रकरणी नाईक कुटुंबासह 7 जणांना अटक

July 21, 2016 3:23 PM1 commentViews:

नवी मुंबई, 21 जुलै : नवी मुंबईतल्या स्वप्नील सोनावणे हत्येप्रकरणी संपूर्ण नाईक कुटुंब आणि त्यांच्याशी संबंधित सात जणांना अटक करण्यात आली आहे. तर मुलीलाही ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणी दिरंगाई केल्यानं दोन पोलीस अधिकारी निलंबित करण्यात आले आहे.swapnil

स्वप्नील सोनावणेच्या हत्येप्रकरणी बुधवारी पोलिसांनी नाईक कुटुंबातल्या तिघांना तर त्यांच्या दोन मित्रांना अटक केली होती. रात्री उशिरा आणखी दोघांना अटक करण्यात आली. यात एका रिक्षाचालकाचाही समावेश आहे. तर या प्रकरणातल्या मुलीलाही ताब्यात घेण्यात आलं असून तिची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आलीये. या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश माने आणि उपनिरीक्षक सोनाली राजगुरू यांनी निलंबित करण्यात आलंय.

स्वप्नील सोनावणे हत्याकांडाचा घटनाक्रम

- मंगळवारी रात्री नाईक कुटुंबीयांचा स्वप्नीलवर हल्ला
– नाईक कुटुंबीयांच्या मारहाणीत स्वप्नीलचा मृत्यू
– सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास नेरुळ पोलिसांची चालढकल
– दबावानंतर नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये 5 जणांवर गुन्हा
– नाईक कुटुंबातल्या तिघांसह 5 जणांना अटक
– दिरंगाई केल्यानं नेरुळ पोलीस स्टेशनमधील 2 अधिकारी निलंबित
– हत्येप्रकरणी आणखी 2 अटकेत, मुलीचीबालसुधारगृहात रवानगी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • amit

    कोपर्डी घटने मध्ये त्यांच्या घरच्यांना कुठे अटक केली ? इकडे मात्र सगळे कुठूम्ब जेलमध्ये ..तपास करण्याचा हा कोणता प्रकार आहे

close