मुक्या जीवाशी क्रुर थट्टा, कुत्र्याच्या 3 पिल्लांना जिवंत जाळलं

July 21, 2016 4:51 PM0 commentsViews:

21 जुलै : अल्पवयीन मुलांनी भटक्या कुत्र्याच्या 3 पिल्लांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणांपैकी एकाने या घटनेचं चित्रीकरण केलं होतं. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

dog_burn3मुशीराबादमधील पठाणवाडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या विकृत 7 मुलांना ताब्यात घेतलं असून समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे ही मुलं काही वेळ त्या पिल्लांशी खेळत होती आणि त्यानंतर मस्ती म्हणून जवळच आग पेटवली. त्यानंतर मुलांनी शेपटीला धरुन त्या पिल्लांना ओढत नेलं आणि आगीत फेकून दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close