धुमसत्या काश्मिरमुळे अमरनाथ यात्रेकरू परतीच्या वाटेवर !

July 21, 2016 5:51 PM0 commentsViews:

रायचंद शिंदे,अमरनाथ – 21 जुलै : देशभरातले भाविक प्रसिद्ध अशा अमरनाथ यात्रेला जात असतात. पण यात्रेतून 5 दिवसानंतरच भाविक माघारी फिरू लागले आहे. कारण 10 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लावण्यात आला आहे, मोबाईल,टेलिफोन यंत्रणा बंद पडलीये. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुर्‍हान वाणीच्या एन्काऊंटरमुळे काश्मीरमधली परिस्थिती बिघडली आहे. आणि त्याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर झालेला पहायला मिळतोय.amarnath3

अमरनाथ यात्रेचा प्रवास सुरू होतो तो जम्मू पासून…जम्मूपासून- उधमपूर-अनंतनाग-किस्तवार- बारामुल्ला या श्रीनगरकडे जाणार्‍या एकमेव महामार्गावरून बस किंवा खासगी वाहनाने प्रवास करताना इथला निसर्ग खुणावत असला तरी दहशतवादाची भीती मनात ठेवूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळेच यात्रेदरम्यान कायमच सैन्याला संपूर्ण सुरक्षा पुरवावी लागते. तरीही अनेक प्रवासी दूरवरुन यात्रेसाठी येत असतात.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी 2 जुलैला दर्शन घेऊन या यात्रेचा प्रारंभ केला. सुरुवातीचे 4 दिवस यात्रा व्यवस्थित पार पडली पण 7 जुलैला बुरहान वाणी मारला गेला. आणि संपूर्ण काश्मीरमध्ये हिंसाचार उसळला. श्रीनगरसह कश्मीरच्या आठही जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आला. जाळपोळ, दगडफेक, यात्रेकरू आणि जवानांवर हल्ले, ठिकठिकाणी रस्ते अडवले गेले ही परिस्थिती आहे काश्मीरची. 1990 नंतर पहिल्यांदाच एकतर्फी लिखाण करणारी आणि दहशतवाद्यांना कव्हरेज देणारी इथली प्रिंट मीडियाची कार्यालयं सैन्याने ताब्यात घेतली आहेत. आणि वाढता तणाव लक्षात घेता 24 जुलैपर्यंत शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आलीयेत.

काही भाविक यात्रा पूर्ण करतायत तर काही अनेक भागात अडकलेत, काही परत माघारी फिरलेत. अडकलेल्या भाविकांना आधार होता तो सुरक्षा दलाच्या जवानांचा. तर सेवाभावी संस्थांच्या वतीनं भाविकांची लंगरमध्ये जेवणाची सोय करण्यात आली आहे. पण यासगळ्या परिस्थितीचा घोडे व्यवसायिक आणि दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झालाय.

अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांना यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण अमरनाथ यात्रा कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहणार अशीच भाविकांची भावना आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close