असा सापडेल ‘पोकेमॉन गो’

July 21, 2016 7:47 PM0 commentsViews:

पोकेमॉन हे असे नाव आहे जे आपण लहाणपणापासून एकत आलो आहोत. पोकेमॉन चा इतका क्रेझ होता की, मुलं स्वप्नामध्ये पोकेमॉन ला पकडायला लागले होते. पण आता हे स्वप्न खरं झालंय. आता आपण खरोखर पोकेमॉन ला पकडू शकतो. हे शक्य झाले आहे आत्ताच लाँच झालेल्या पोकेमॉन गो या गेममुळे…लाँच झाल्यानंतर सोशल मीडियावर या गेमची धूम आपल्याला पाहायला मिळत आहे.

पोकेमॉन हा ऑगमेंटेड रिऍलिटी गेम आहे. हा गेम Niantic Lab ने तयार केलेला आहे. हा गेम आइओएस आणि अँड्राईड दोघांवर उपलब्ध आहे. ‘अँग्री बर्ड’ला टक्कर देणारा हा गेम इतका प्रसिद्ध झाला आहे की, कंपनीचे सर्व्हर डाऊन होऊ लागले आहे. पोकेमॉन एक असा गेम आहे जो तुम्हाला या गेम ची सवय लावेल सोबतच तुम्हाला अनोळख्या जागी पोहोचवेल.

या गेम ला तुम्ही घरबसल्या खेळू शकत नाही. यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पडावे लागेल. या गेम ला डाऊनलोड करायचे असेल तर पहिले APK फाईल डाऊनलोड करावी लागेल. त्यानंतर लिंक वरुन गेम डाऊनलोड करतांना काळजी घ्यावी कारण हैकर्स या संधीचा फायदा घेवू शकतात. गुगलवर ‘पोकेमॉन गो’ लिंक सर्च करुन डाऊनलोड ऑपशन क्लिक करावे. स्मार्टफानच्या सेटिंगमध्ये जावून allow installation of apps from unknown sources ला एक्टिव्ह करुन घ्यावे. आता apk फाइल ओपन करुन installation करावे. सगळ्यात पहिले आपल्या गुगल अकांऊट वरुन याला रजिस्टर करुन घ्यावे लागेल. आता तुम्ही खरोखरच्या पोकेमॉन ला पकडायला तयार आहात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close