इंजिनीअरच्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला

July 21, 2016 7:51 PM0 commentsViews:

पुणे, 21 जुलै : पुण्याजवळ घोडेगावमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. शंकर डगळे असं या आरोपीचं नाव आहे. विद्यार्थिनीच्या गळ्यावर ब्लेडनं वार करून जीवघेणा हल्ला करुन हल्लेखोर फरार झालाय. तरुणीवर घोडेगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.kolhapur crime

घोडेगाव ता. आंबेगाव जवळील कोटमदारा वस्तीमध्ये बुधवार दुपारी एकच्या दरम्यान इंजनियरिंग शिकणार्‍या उच्च शिक्षित तरुणीच्या गळ्यावर शेजारीच राहणार्‍या शंकर बाळू डगळे तरुणाने ब्लेडने जीवघेवी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, मुलीवर घोडेगाव येथील डॉ. लोहोकरे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गळ्यावर वार करून जीवघेणा हल्ला असूनही घोडेगाव
पोलिसांकडून फक्त 324 कलमान्वये गुन्हा दाखल केल्याबद्दल मुलीच्या नातेवाईकांची नाराजी व्यक्त केलीये. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close