जर्मन बेकरीत स्फोट घडवणार्‍यांची ओळख पटली

April 8, 2010 8:37 AM0 commentsViews: 1

8 एप्रिलपुण्यातील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट घडवणार्‍या चार संशयीतांची ओळख पटली आहे. यामधील एक जण रियाझ भटकळ याचा भाऊ यासीन भटकळ आहे. त्यामुळेच इंडियन मुजाहिदीनचा स्फोटातील सहभाग उघड झाला आहे. या स्फोटात इंडियन मुजाहिदीनच्या नेटवर्कचा वापर करण्यात आला होता. तसा रिपोर्ट महाराष्ट्र एटीएसने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सादर केला आहे. हे संशयीत पळून जाण्यात यशस्वी झाले, अशीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एटीएसला या संशयीतांना शोधण्यासाठी आणखी जोमाने तपास करावा लागणार आहे.

close