दाऊद इतका रिकामा होता का ?, जो मलाच फोन करेन- खडसे

July 21, 2016 10:11 PM0 commentsViews:

21 जुलै : दाऊद इब्राहिम इतका रिकामा आहे का ? जो आपल्या पत्नीच्या मोबाईलवरून फोन करेल आणि मला म्हणणार ‘क्या खडसेसाहब’ कैसे हो आप…सगळे जण मला शोधताय, मी तुम्हाला शोधतोय ? म्हणून बायकोला सांगितलं..असं कधी हा डॉन मला म्हणेल का ? शेंबड्या पोराला पण यावर विश्वास बसणार नाही असं म्हणत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपाची खिल्ली उडवली.khadse_latur

विधानसभा आणि विधान परिषदेत आज मंत्र्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवर चर्चा झाली. विरोधकांनी नियम 293 नुसार चर्चेची मागणी केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, धनंजय मुंडे, भाई जगताप यांनी सरकारवर भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. तर एकनाथ खडसे यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले.

40 वर्षांचं संघर्षमय राजकीय जीवन अशा आरोपांनी कलंकित होऊ शकत नाही असं सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्यावर फक्त आरोप झाले, त्याबद्दलचा एकही पुरावा नसल्याचा दावा खडसेंनी केला. मी कुणालाही घाबरत नसल्याचं त्यांनी म्हटलं. आज माझ्यावर आरोप झाले, उद्या तुमच्यावरही होतील, असा सल्लाही खडसेंनी दिला. पुरावे नसताना आरोप करून एखाद्याचं राजकीय जीवन उद्धवस्त करू नये, असं खडसेंनी म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close