मुंबई रस्ते घोटाळा प्रकरणी दोषींवर मोक्का अंतर्गत होणार कारवाई

July 22, 2016 1:57 PM0 commentsViews:

mumbai_raodमुंबई, 22 जुलै : मुंबईतल्या रस्त्यांची दुरवस्था करून, लाखो मुंबईकरांचे हाल करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. मुंबईमधल्या रस्ते घोटाळा प्रकरणी दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल अशी घोषणा नगरविकास राज्य मंत्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत केली.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी रस्ते घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना रणजीत पाटील यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. त्यामुळे संबंधित कंत्राटदार, अधिकारी, सल्लागार, लेखापाल यांना मोक्काच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. मात्र, त्यापूर्वी सरकार कायदेशीर सल्ला घेणार आहे. विधी खात्यानं यासाठी हिरवा कंदिल दिल्यास, मुंबईकरांना काहीसा न्याय मिळेल असं म्हणावं लागेल. रस्ते घोटाळ्याला जबाबदार असणार्‍या दहा लेखा परीक्षकांना अटक करण्यात आली आहे. तसंच 2 अभियंत्यांनाही अटक करण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close