भारतीय वायू सेनेचं 29 प्रवाशी असलेलं विमान बेपत्ता, शोधमोहीम सुरू

July 22, 2016 3:04 PM0 commentsViews:

an 32नवी दिल्ली, 22 जुलै : भारतीय वायू सेनेचं एन-32 विमान बेपत्ता झालंय. एन-32 विमान चेन्नई ते पोर्ट ब्लेयरच्या मार्गातून अचान क गायब झालं. या विमानात 29 जण असल्याची माहिती मिळतेयं.

एन-32 विमान सकाळी 9 वाजता तांबरम हवाई तळावरून विमानानं पोर्ट ब्लेअरकडे उड्डाण केलं होतं. हवाई दलासाठी नियमित हे उड्डाण होतं. पण त्यानंतर काही तासांनंतर त्याचा संपर्क तुटला. या विमानात 29 जण होते. बंगाल उपसागरावर असताना विमान बेपत्ता झालंय. नौदल, वायू सेना आणि कोस्टगार्ड या बेपत्ता विमानाच्या शोधात मोहिम हाती घेतलीये. रशियामध्ये या विमानाची निर्मिती करण्यात आली होती. छोट्या धावपट्टीवरून उड्डाण करण्याची क्षमता या विमानात होती. भारतीय हवाई दलाकडे असे 100 एन-32 विमानं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close