विराटची शतकी खेळी, पहिल्या दिवशी भारत 302 वर 4 बाद

July 22, 2016 5:11 PM0 commentsViews:

virat3322 जुलै : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या पहिल्या टेस्टचा पहिला दिवस भारतीय बॅट्समननी गाजवला. विराट कोहलीच्या नाबाद 143 रन्सच्या खेळीवर भारताने पहिल्या दिवशी 302 रन्सपर्यंत मजल मारली.

पहिल्या दिवशी बॅटिंगसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात अडखळत राहिली. ओपनिंगचा मुरली विजय लवकर आउट झाला, त्याला गॅब्रिएलनं आऊट केलं. त्यानंतर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसर्‍या विकेटसाठी 60 रन्सची भागीदारी केली. पण चेतेश्वर पुजाराही लवकर बाद झाला.

दुसर्‍या बाजूनं शिखर धवननं बाजू लावून धरली, पण त्याची सेंच्युरी हुकली. तो 84 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीनं मात्र, वेस्ट इंडिजच्या बॉलर्सवर अक्षरशः हुकुमत गाजवली. दिवसअखेर विराट 143 रन्सवर नाबाद राहिला. अजिंक्य रहाणेही लवकर आऊट झाला. त्यानं 22 रन्स केल्या. विराटच्या सोबतीनं आर. अश्विन खेळतोय, तो 22 रन्सवर नाबाद आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close