‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ला पुणेकरांचा विरोध, पेट्रोल पंप संघटनेचाही बंदचा इशारा

July 22, 2016 6:15 PM1 commentViews:

पुणे, 22 जुलै : नो हेल्मेट-नो पेट्रोल या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या घोषणाला पुणेकरांनी विरोध दर्शविला आहे. हेल्मेटचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी रावते यांनी हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही, अशी घोषणा विधान परिषदेत केली. त्यामुळे हेल्मेटशिवाय बाईक चालवणार्‍यांवर कारवाई होणार का, हा प्रश्न निर्माण झालाय.no helmet_no_petrol

हेल्मेट सक्तीलाही पुणेकरांनी विरोध दर्शविला होता. पुण्यात सर्वात जास्त दुचाकी चालवली जाते. रावते यांचा निर्णय हा व्यावाहरिक नाहीय असं मत पुणेकरांनी व्यक्त केले आहे. एवढंच नाहीतर लोकांच्या जीवाची एवढी काळजी असेल तर दारूबंदी करा अशी प्रतिक्रियाही पुणेकरांनी दिली. दरम्यान, अल फेडरेशन ऑफ पेट्रोलपंप संघटनेनं देखील या निर्णयला विरोध दर्शवलाय. शासनाला अंमलबजावणी करता येत नाही म्हणून असा निर्णय घेतल्याची टीका फेडरेशनने केलीये. तसंच या नियमाची सक्ती केल्यास महाराष्ट्र बंद पाडण्याचा इशाराही दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Madhukar

    helmate is our need , we can save from sunlight, rain & cold. so it is our need so their is no issue for compulsion.

close