मुंबईतही ‘कबाली डे’

July 22, 2016 6:44 PM0 commentsViews:

ढोल ताशांचा गजर, कटआऊट्सवर उधळली जाणारी फुलं…होडीर्ंग्जची होत असलेली आरती…आणि सिनेमाच्या पोस्टरवर झालेला दुग्धाभिषेक…हा नजारा कुठल्या मंदिरातला नाही तर माटुंग्यातील अरोरा टॉकिजचा आहे. या टॉकिजच्या परिसराचा ताबा आज पहाटेपासूनच रजनीच्या फॅन्सनी घेतला. काहीही करून आपल्या लाडक्या स्टारचा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पहाण्यासाठी फॅन्सच्या झुंडीच्या झुंडी थिएटर्सवर येऊन थडकत होत्या..दिवसाचे सगळे शोज केव्हाच हाऊसफुल्ल झाल्यामुळे ब्लॅकचीही चाचपणी सुरू झाली…तर ब्लॅकच्या तिकिटाचा दरही हजार रूपयांच्या वर गेल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. रजनीकांतचे मुंबईतले सगळे फॅन क्लब आपल्या लाडक्या ‘थलायवा’ला भेटण्यासाठी आतूर झाले होते.त्यामुळे या थिएटरमध्ये एखादा सण किंवा उत्सव सुरू आहे की काय अशी शंका बघ्यांना नजरेतून व्यक्त होत होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close