विमानाचे इंधन चोरणारे अटकेत

April 8, 2010 9:35 AM0 commentsViews: 8

अजित मांढरे, मुंबई 8 एप्रिलमुंबईच्या आरसीएफ पोलिसांनी विमानाचे इंधन चोरणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. एअरपोर्टला इंधन पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फोडून पर्यायी पाईपलाईनद्वारे हे इंधन चोरले जात होते. आतापर्यंत कोट्यवधी रूपयांचे इंधन या टोळीने चोरले आहे. जर हे आरोपी वेळीच पकडले गेले नसते तर मोठा घातपात होऊ शकला असता. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अंधेरीतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुरवल्या जाणार्‍या इंधनाची ते चोरी करत होते. एअरपोर्ट ते आरसीएफ कंपनी पर्यंत एअरपोर्ट ऍथॉरिटीची 15 किलोमीटरची पाईपलाईन आहे. ती पाईपलाईन फोडून एका पाईपद्वारे रेल्वे ट्रॅकच्या खालून ते एका गॅरेजमध्ये पेट्रोल आणून सोडत. अशा प्रकारे रोज रात्री ते 30 हजार लीटर म्हणजे जवळपास 36 लाखांच्या पेट्रोलची चोरी करायचे.या इंधनाची बाजारात किंमत आहे प्रति लिटर 42 रूपये. गेल्या तीन महिन्यांपासून ते या इंधनाची चोरी करत होते. म्हणजे आतापर्यंत या चोरांनी कोट्यवधी रूपयाचे इंधन चोरले आहे. त्यांच्या या पद्धतीमुळे पोलीसही चक्रावून गेले.काही दिवसांपूर्वी एटीएसने ज्या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती, त्यांनी मुंबईत एचपीसीएल आणि बीपीसीएलसारख्या तेल कंपन्यांना उडवण्यासाठी रेकी केली होती. अशातच या इंधनचोरांच्या कार्यपद्धतीमुळे मुंबईतील असुरक्षितता आणि महत्वाच्या ठिकाणची ढिसाळ सुरक्षाव्यवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे.

close