कॉलेजला प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

July 22, 2016 9:10 PM0 commentsViews:

नवीमुंबई, 22 जुलै : कळंबोलीमध्ये एका 16 वर्षांच्या विद्यार्थिनीने कॉलेजमध्ये ऍडमिशन न मिळाल्यामुळे आत्महत्या केली आहे. दहावीला 83 टक्के मिळवून देखील महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. पुष्पा धनाजी सूर्यवंशी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे.kalmboli4

पुष्पा सुर्यवंशीने अकरावीसाठी ऑनलाईन ऍडमिशन एका कॉलेजमध्ये भेटले होते. परंतु, सुधागड विद्यालय हे जवळ असल्याने पुष्पा ने या सुधागड विद्यालयात ऑफलाईन ऍडमिशन घेतलं तसंच डोनेशन म्हणून 20 हजार रुपये देखील जमा केले होते अशी माहिती पुष्पां च्या निकटवर्तीयांनी दिली. मात्र सुधागड महाविद्यालयात घेतलेलं ऑफलाईन ऍडमिशन रद्द झाल्याचं समजल्यावर पुष्पाने अत्यंत मानसिक तणावात होती आणि याच तणावाखाली तिने राहत्याघरी गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी प्राप्त झालेल्या सुसाइड नोटमध्ये देखील पुष्पा ने ऍडमिशन न मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून विद्यालयाचा भोंगळ कारभार, ऑनलाईन आणि ऑफलाईन ऍडमिशन प्रक्रियेतल्या घोळामुळे विद्यार्थी भरडला जातोय. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close