मुख्यमंत्र्यांनी थांबवला आठवलेंचा कोपर्डी दाैरा, विमानतळावरुन आठवले माघारी

July 23, 2016 2:01 PM0 commentsViews:

23 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्यामुळे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंना आपला कोपर्डीचा दौरा रद्द करावा लागला आहे. कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी आठवले आज मुंबई विमानतळावर पोहोचलेही होते.ramdas_Athavale_#

विमानतळावर असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांचा रामदास आठवलेंना फोन आला. कोपर्डीतल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना अन्यत्र हलवण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही कोपर्डीला जाऊ नका, अशी सूचना त्यांच्याकडून देण्यात आली. त्यामुळे आठवलेंना विमानतळावरून परतावं लागल्याचं समजतं आहे. तर सुरक्षेच्या कारणामुळे आठवलेंना रोखण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोपर्डीला जाण्यापासून रोखलेल्या आठवलेंनी आपला मोर्चा नवी मुंबईकडे वळवला. आठवले नवी मुंबईत स्वप्नील सोनावणेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. स्वप्नील या तरुणाची प्रेमप्रकरणात हत्या झाली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close