बोअरवेल, साप आणि मृत्यू ; एका ‘प्रिन्स’ ची थरारक लढाई कॅमेऱ्यात कैद

July 23, 2016 4:42 PM0 commentsViews:

मध्यप्रदेश, 23 जुलै : बोअरवेलमध्ये लहान मुलं पडण्याच्या घटना नेहमी घडत आल्यात. काही वेळा या चिमुरड्यांना वाचवण्यात यश आलं तर काही जणांचा दुदैर्वी यात मृत्यू झाला. पण मध्यप्रदेशमध्ये अंगावर शहारे आणणार मृत्यूचा थरार कॅमेर्‍यात कैद झाला. पचौरी नावाचा चिमुरडा अशाच एका बोअरवेलच्या खड्यात पडला आणि त्याच्या भोवती मृत्यूरुपी सापाचा वावर…अशा परिस्थितीतून त्याला बाहेर काढलं पण तोपर्यंत उशीर झाला होता.mp_news3

मध्यप्रदेशातल्या ग्वाल्हेरजवळ खेरी ह्या गावात ही घटना घडली. या गावात एका तिनशे फूट खोल बोअरवेलमध्ये एक तीन वर्षांचा पचौरी पडला. पण सुदैवाने 25 फुटांवर अडकला. 25 फुटांवर अडकलेल्या पचौरीला काढणं जवळपास शक्य होतं. पण धक्कादायक म्हणजे पचौरी ज्या ठिकाणी अडकला होता त्या खड्यात सापाचा वावर होतो. एवढंच नाहीतर सापही त्याच्या आसपास आढळून आले. हा सगळा थरार कॅमेर्‍यात कैद झाला. त्यामुळे पचौरीला कसं वाचवायचं असा मोठा प्रश्न पुढे होता. साप पचौरीला दंश करणार नाही याची खबरदारी घेत त्याला बाहेर काढण्यात आलंय. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पचौरीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी पचौरीला मृत घोषित केलं. शर्थीच्या प्रयत्नानंतर पचौरीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close