पुष्पा सूर्यवंशी आत्महत्येप्रकरणी ‘सुधागड’च्या प्राचार्याना अटक

July 23, 2016 5:03 PM0 commentsViews:

नवी मुंबई, 23 जुलै : पुष्पा सूर्यवंशी आत्महत्येप्रकरणी सुधागड एज्युकेशनचे प्राचार्य इकबाल इनामदार यांना अटक करण्यात आली.
महाविद्यालयात प्रवेशामध्ये फसवणूक केल्याच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आलीये.sudhagad3

अकरावीमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे पुष्पा सुर्यवंशी या विद्यार्थीनीनं आत्महत्या केली होती. कळंबोलीमध्ये राहणार्‍या पुष्पाला दहावीमध्ये 83 टक्के मार्क्स मिळाले होते. तीला एका कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश मिळाला होता.

मात्र सुधागड एज्युकेशन हे जवळ असल्यानं पुष्पाने सुधागड विद्यालयात ऑफलाईन प्रवेश घेतला होता. तसंच डोनेशन म्हणून 20 हजार रुपयेही जमा करून घेतले होते. अशी माहिती पुष्पाच्या नातेवाईकांनी दिलीय. मात्र सुधागड विद्यालयाने ऑफलाईन प्रवेश रद्द केल्यानं पुष्पा मानसिक तणावात होती. आणि याच तणावात पुष्पाने आत्महत्या केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close