स्पेशल रिपोर्ट : परभणीत आयसिसविरोधात मुस्लिम तरुणांमध्ये जनजागृती

July 23, 2016 5:44 PM0 commentsViews:

परभणी, 23 जुलै : परभणीमध्ये आयसिसशी संबंधीत नासेर बिन चाऊस नावाच्या तरुणाला अटक झाली आणि आयसिस कनेक्शन जगापुढ समोर आलं. मात्र त्यानंतर मुस्लीम समुदायामध्ये एक अस्वस्थताही पसरलीये. आयसिसचा धोका उंबरठ्यावर आला असतांना तरुणांमधील आयसिसचा प्रभाव संपवण्यासाठी परभणी पोलीस आणि मुस्लीम समुदाय एकत्र आले आहे.parbhani_isis3

नासेर बिन चाऊस च्या प्रकरणानंतर परभणीच्या एस. पी. नियती ठाकूर यांनी सर्व मुस्लिम धर्मगुरू,नागरिक,पालकांची बैठक घेतली. आणि आयसिसविरोधात जनजागृती, समुपदेशन करण्याचा आवाहन केलं. या आवाहनाला परभणीच्या मुस्लीम समुदायानं भरभरुन प्रतिसाद दिला. आठवड्यापासून जिल्ह्यातील सर्व मशिदी, मदरश्यामध्ये नमाजनंतर तालीम मधून आयसिसने मुस्लिम समाजाला कसं बदनाम केलंय. ते समजवलं जातंय. या कामासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जातोय.

पोलिसांनी यासाठी दोन पथक स्थापन केलेत. हे पथक जिल्ह्यातील शाळा,कॉलेजमध्ये जावून आयसिसचा धोका आणि दहशतवादाबद्दल जनजागृती करत आहे.

जिल्ह्यात मुस्लिम समाजाची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे या जिल्ह्यात कट्टरवादी संघटनाही कार्यरत आहे. घाटकोपर बॉम्बस्फोटात सहभागी असल्याच्या आरोपाहून ख्वाजा यूनूस या तरुणाला परभणीतून अटक केली होती. त्याचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला होता. पुढे तो निर्दोष असल्याचं स्पष्ट झाला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close