फेसबुकचा नवा प्रयोग, ड्रोनद्वारे इंटरनेट !

July 23, 2016 8:19 PM0 commentsViews:

गुगलपाठोपाठ फेसबुकनेही इंटरनेटचं जाळं पसरवण्यासाठी पाऊल टाकलं आहे. फेसबुकने ‘लाइटबल्ब’च्या माध्यमातून इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. यामुळे तुम्हाला कुठेही इंटरनेट वापरता येणार आहे.

देशात तब्बल 4 बिलीयन लोकांना अजुनही इंटरनेटपासून दूर आहे. यावर उपाय म्हणून फेसबुकने कोणतेही टॉवर, केबल याचा वापर न करता थेट आकाशातून इंटरनेट सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकचा हा प्रोजेक्ट गूगलच्या लून प्रोजेक्टच्या धर्तीवर आहे. ड्रोनच्या माध्यमातून ‘लाइटब्लब’द्वारे तुमच्यापर्यंत इंटरनेट पोहचवणार आहे. या लाइटब्लबद्वारे 2 जीबीपीएसची स्पीड मिळेल असा दावा फेसबुकने केलाय. फेसबुक सुर्याच्या किरणांच्या मदतीने हे काम साध्य करणार आहे. यामुळे हाय बँडविथ आणि डाटा ट्रान्सफर सुविधा मिळणार आहे. फेसबुकचा लाइटबल्ब लाइट कंट्रोलर प्लास्टिक ऑप्टिक फायबरने बनला आहे. ज्यात प्रकाशाला एकत्र करुन त्या माध्यमातून जमिनीवर नेटवर्क उपलब्ध करुन दिले जाईल. ऑप्टिका जर्नलमध्ये केलेल्या दाव्यानुसार सध्या 2 एमबीपीएस स्पीड मिळत आहे. भविष्यात हिच स्पीड 10 एमबीपीएस पर्यंत पोहचेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close