मी कुणाचा तरी मर्डर करीन; डॉक्टरची रुग्णाला धमकी

July 23, 2016 8:43 PM0 commentsViews:

सोलापूर, 23 जुलै : प्रसुतीवेळी आपल्या पत्नीची हेळसांड केल्याबद्दल करमाळा जिल्हा उपरुग्णालयातील संबंधितांवर कारवाईची मागणी करणार्‍या सोमनाथ वाघमारे नामक व्यक्तीला खुद्द हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. केमकर यांनी कोणाचातरी मर्डर करण्याची धमकी दिलीये. त्यामुळे वाघमारे कुटुंबात भितीचे वातावरण पसरलंय.solapur_doct

करमाळा तालुक्यातील पोफळज गावच्या सोमनाथ भारत वाघमारे यांनी 11 जुन रोजी पत्नी प्रियांका वाघमारे हीला प्रसुतीसाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात सकाळी 8 वाजता दाखल केले. त्यांना दाखल करून घेतल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांच्यावर कोणतेही उपचार न करता तसंच ठेवलं. यावेळी प्रियांका वाघमारे असह्य वेदनानी व्हिवळत होत्या. पण कोणालाही त्यांची दया आली नाही.

घडलेल्या सार्‍या प्रकाराबाबत वाघमारे यांनी अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर केमकरसह इतरांविरोधात जिल्हाधिकारी आणि जिल्हा शैल्यचिकित्सकांकडे तक्रार केली. यावरून जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश दिले. माञ त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट वाघमारे कुटुंबीयांना धमकीला सामोरं जावं लागलंय. त्यामुळे संतापलेल्या वाघमारे यांनी या घडलेल्या प्रकाराविषयी मुख्यमंञ्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे ते या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेणार का? शासकीय यंत्रणा सर्वसामान्यांसाठी असल्याची भावना जोपासण्यासाठी प्रयत्न करणार का हाच खरा प्रश्न आहे.

डॉक्टर केमकर आणि रुग्णांचे नातेवाईकांशी काय संवाद

सोमनाथ वाघमारे(तक्रारदार) – साहेब, त्या केससंदर्भात सध्या काय स्थिती आहे? आपण अहवाल पुढे पाठवला आहे का?

डॉ.केमकर – आम्ही आमच्या पद्धतीनं अहवाल जसा पाठवायचा तसा पुढे पाठवलाय, आता वरिष्ठ ठरवतील पुढे काय कारवाई करायची

तक्रारदार – तसं नाही, पण मला सगळे लोक विचारतात की पुढे काय झालं तुझ्या तक्रारीचं, आज पत्रकार देखील विचारात होते, पुढे काय झालं म्हणून?

डॉ.केमकर – त्यांना सांगा आता जास्त चौकशी करू नका म्हणावं, आता यात कुणाचा तरी मर्डर होईल, ते सारखं विचारणार्‍याचा पण होईल किंवा मग कुणाचा पण होईल, मला माहीत नाही

तक्रारदार – कुणाचा मर्डर कशाला करता साहेब, त्यापेक्षा आम्हीच आम्हाला संपवून टाकतो


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close