कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना जिवंत जाळा-जोगेंद्र कवाडे

July 23, 2016 8:49 PM0 commentsViews:

23 जुलै : कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातल्या आरोपींना जिवंत जाळण्याची शिक्षा करायला हवी अशी संतप्त मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी केलीये. जोगेंद्र कवाडे यांनी कोपर्डी गावाला भेट देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना रोखण्यात आलं. मानसिक विकृतीतून कोपर्डीला जाण्यापासून रोखल्याचा आरोपही त्यांनी केलाय.kavade_45

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांनी आज कोपर्डीला पीड़ित कुटुंबीयांच्या भेटीचा प्रयत्न केला मात्र कायदा सुव्यवस्थेच्या करणास्तव त्यांना नगरलाच रोखण्यात आलं. यावेळी त्यांनी कोपर्डीची घटना अत्यंत क्रूर असून आरोपीना जिवंत जाळण्याच्या शिक्षेची मागणी केली आहे. त्याचबरोबर पीड़ित कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे आणि पाच ऑगस्टपर्यंत खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्याची मागणीही त्यांनी केलीय.तसंच नवी मुंबईच्या स्वप्नील सोनावणे ऑनर किलिंग आणि पोलिसांच्या निष्क्रियतेचा बळी ठरल्याचा आरोपही त्यांनी केलाय. राज्यात सहा जलदगती न्यायालयात घोषणा केली मात्र अजूनही याची अंमलबजावणी झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय तर 27 तारखेला विधानसभेवर मोर्चाही काढणार असल्याचं कवाडे यांनी सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close