…म्हणून रस्त्यावरचे खड्डे दिसले, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

July 23, 2016 8:58 PM0 commentsViews:

uddhav_3452fमुंबई, 23 जुलै : यावर्षी एक चांगलं झालं की कुठेही पाणी तुंबलं नाही म्हणून या लोकांना रस्त्यावरच खड्डे दिसू लागले आहे असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख न करता लगावला. तसंच कोणत्याही प्रकरणाची चौकशी करा उलट या चौकशीतून काहीही हाती लागत नाही यामुळे आम्हाला आमच्या कामाचं प्रशस्तीपत्रक मिळतंय असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. ते मुंबईत बोलत होते.

मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुर्तीकार आणि गणेशोत्सव मंडळांची सभा आयोजीत केली आहे. वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात ही सभा होत आहे. या सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. तसँच पावसाळ्यात उद्भवणार्‍या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील. यांचेही मार्गदर्शन बीएमसीचे आरोग्य अधिकार्यांनी यावेळी केली. या सभेत मुंबईतील दहा हजारहून अधिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी आणि गणेश मुर्तीकार सहभागी झाले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close