हवाई दलाचे विमान अजूनही बेपत्ताच

July 25, 2016 11:07 AM0 commentsViews:
२४ जुलै – हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचा अद्याप शोध लागू शकला नसल्याचे केंदीय संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले आहे. खराब हवामान आणि विमानाचा संपर्क जिथे तुटला तिथे समुद्राच्या पाण्याची खोली साडेतीन किलोमीटर असल्याने शोधमोहिमेला अडचण निर्माण होत असल्याचे डॉ भामरे यांनी सांगितलं़
. भारतीय हवाई दलाचं चेन्नईहून पोर्टब्लेअरला जाणारे एएन-32 हे  विमान बंगालच्या उपसागरावरून बेपत्ता झाल्यानंतर या विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी पाणबुड्याचा वापर केला जात आहे.गेल्या 48 तासापासून हे विमान शोधण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचं  भामरे म्हणाले.
 an_32_air
दरम्यान काश्मीर मुद्यावर पाकच्या भूमिकेबाबतही त्यांनी परखड भूमिका घेत काश्मीर मुद्यावर डॉ भामरे यांनी पाकचे कान उपटले असून, पाकिस्तान मध्ये लोकशाही नावालाच आहे, त्या देशात सैन्य आणि दहशदवादी संघटना देश चालवतात  त्यामुळे त्यांनी स्वतःच्या देशाची काळजी घ्यावी. काश्मीरच्या  मुद्दावर बोलू नये, आम्ही आमच्या देशाच्या सीमा आणि काश्मीर सांभाळायला सक्षम असल्याची स्पष्टोक्ती  डॉ भामरे यांनी केली आहे.
एअर फोर्सच्या बेपत्ता झालेल्या विमानात निगडीच्या फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचाही समावेश
एअर फोर्सच्या बेपत्ता झालेल् या एएन-32  या विमानातील 29 जणांमध्ये निगडीच्या फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचा समावेश आहे. 28 वर्षांचे कुणाल बारपट्टे हे विमानात नेव्हीगेटर म्हणून काम करीत होते. कुणाल यांचं विमान बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या आईवडिलांना मोठा धक्का बसलाय. कुणाल यांचे बाबा राजेंद्र आणि आई विद्या यांची तब्येत खालावल्यानं त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. स्थानिक खासदार  बारणे आणि कुणालचे मामा सातत्यानं हवाईदलाच्या संपर्कात आहेत. कुणाल यांच्या सुरक्षितेसाठी त्याचे नातेवाईक मित्र आणि शेजारी पार्थना करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close