काळवीट शिकार प्रकरणातून सलमानची निर्दोष सुटका

July 25, 2016 1:27 PM1 commentViews:

Salman-Khan25 जुलै : जोधपूर काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मोठा दिलासा मिळालाय. काळवीट शिकार प्रकरणातून सलमान खान याची निर्दोष सुटका झालीये. राजस्थान हायकोर्टाने हा निकाल दिलाय. ठोस पुराव्यांअभावी सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये.

2008 मध्ये सलमान खान आणि त्याच्या 7 साथीदारांविरोधात काळविटाची शिकार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी राजस्थानातल्या सत्र न्यायालयानं सलमानला 6 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात सलमान राजस्थानच्या हायकोर्टात धाव घेतली होती कोर्टाने त्याची पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष सुटका केलीये. हायकोर्टाने या प्रकरणावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुनावणी पूर्ण केली होती पण निर्णय दिला नव्हता. मुंबई हिट अँड रन प्रकरणीही काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयानं सलमानला निर्दोष सोडलं होतं.

काय आहे प्रकरण?
राजस्थानच्या भवडमध्ये ‘हम साथ साथ है’ सिनेमाच्या शुटिंगवेळी काळविटाची शिकार केल्याचा सलमानवर आरोप
सलमान आणि इतर 7 आरोपींविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सत्र न्यायालयात सलमानविरोधात खटला चालला, खटल्यात सलमानला 6 वर्षांची शिक्षा
सलमानचं राजस्थान हायकोर्टात शिक्षेविरोधात अपील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खटल्याची सुनावणी पूर्ण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Lakhute V.D

    काळविटाने स्वतः डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली असल !

close