मोदी लाटेनं बुडवलं, सिद्धूंचा भाजपवर हल्लाबोल

July 25, 2016 1:58 PM0 commentsViews:

sidhu_on_bjp_425 जुलै : राज्यसभेची खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. मोदी लाटेत स्वार झालो आणि स्वत:ही बुडालो आणि पक्षही बुडाला अशी घणाघाती टीका सिद्धू यांनी केली. तसंच राज्यसभेची खासदारकी देऊन मला पंजाबपासून दूर राहण्यास सांगितलं होतं असा आरोपही सिद्ध यांनी केला.

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पहिल्यांदाच नवज्योत सिंग सिद्धू माध्यमांसमोर आला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. पंजाब आणि अमृतसर हा माझा श्वास आहे. पण मला जेव्हा राज्यसभेची खासदारकी देण्यात आली तेव्हा पंजाबपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. मी पंजाबपासून कसा दूर राहु शकतो. या गोष्टीचं शल्य मनात होतं. त्यामुळे मी भाजपला सोडचिठ्‌ठी दिली असा खुलासानवज्योतसिंग सिद्धू यांनी केलाय. मी सलग 4 वेळा पंजाबमधून निवडणूक जिंकलोय आणि इथंच मला दूर सारलं जात होतं. हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडलं नाही. मागेही मला विधानसभा निवडणुकीत दिल्लीतून लढण्यास सांगितलं होतं. पण, आपण पंजाब सोडण्यास नकार दिला होता. पंजाबपेक्षा कोणताही पक्ष मोठा नाही अशा शब्दात सिद्धू यांनी भाजपला बजावलं. परंतु, आपण कोणत्या पक्षात जाणार यावर त्यांनी बोलण्याचं टाळलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close