संसदेत शुटिंग महागात पडलं, आपचे भगवंत मान यांना लोकसभेत येण्यास मनाई

July 25, 2016 2:39 PM0 commentsViews:

25 जुलै : संसद भवनाचा परिसर मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करणे आपचे नेते भगवंत मान यांना चांगलेच महागात पडलंय. भगवंत मान यांचं लोकसभेतून निलंबन करण्यात आलंय. चौकशी होईपर्यंत भगवंत मान यांना 3 ऑगस्टपर्यंत अधिवेशनात हजर न राहण्याचे आदेश लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी दिले आहे.bhagvant_maan

भगवंत मान यांनी मोबाईल कॅमेर्‍यामधून संसदेच्या सुरक्षेच्या ढिसाळपणाचं शुटिंग केलं होतं.या प्रकरणी एक 9 सदस्यी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल 3 आॅगस्टपर्यंत देणार आहे. तोपर्यंत भगवंत मान यांना लोकसभेत येण्यास मनाई घालण्यात आलीये. आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे मान यांनी वेगळाच सूर लगावलाय.

नागरिकांच्या समस्यांवर कशाप्रकारे कारवाई केली जाते हे दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. मला संसदेच्या सुरक्षेसंदर्भात काही सांगायचं नव्हतं. मात्र तरीही माझी बाजू ऐकून न घेता माझ्यावर कारवाई झाली अशी भूमिका मान यांनी मांडली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएयआयला पठाणकोटच्या सुरक्षेसंदर्भात माहिती देताना देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत नाही का ? असा सवालही भगवंत मान यांनी केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close