नॉलेज कमिशनच्या शिफारशींवर सरकार काम करतंय – सॅम पित्रोदा

October 14, 2008 3:19 PM0 commentsViews: 4

14 ऑक्टोंबर, मुंबईसध्याच्या शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी शिफारशींच्या पुस्तकांचं प्रकाशन आज मुंबईत करण्यात आलं. नॅशनल नॉलेज कमिशन अर्थात राष्ट्रीय माहिती आयोगानं या शिफारशी केल्या आहेत. आयोगाचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. नॉलेज कमिशननं आतापर्यंत शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारावा, व्यावसायिक अभ्यासक्रमात वाढ, देशभरात 50 विद्यापीठांची गरज, डिस्टन्स एज्युकेशनमध्ये बदल या, अशा अनेक शिफारशी केल्या आहेत. याबाबत सॅम पित्रोदा यांनी अधिक माहिती दिली. ' पंतप्रधानांनी तीन वर्षांपूर्वी नॉलेज कमिशनची स्थापना केली. आतापर्यंत 200 शिफारशी केल्या आहेत. सरकार काम करत आहे. या शिफारशींचा परिणाम लागलीच दिसून येत नाही. 10 ते 15 वर्षांचा काळ जाणं गरजेचं आहे', सध्या भारताच्या टेलिकॉम प्रगतीबाबत समाधानी असल्याचं पित्रोदा म्हणाले.