पाणीचोरांना मनसेचा हिसका

April 8, 2010 10:42 AM0 commentsViews: 2

8 एप्रिलमुंबईत पाणीचोरी करणार्‍या महाभागांना मनसेने चांगलाच हिसका दाखवला आहे. मुंबईतील पायधुनी भागात पहाटे पाण्याची चोरी करणार्‍यांना मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला. तसेच चोरीचे कनेक्शनही बंद केले. मनसेच्या या आंदोलनाची पाणीचोरांनी चांगलीच दहशत घेतली आहे. तर मंगळवारी काही पाणीचोरांना खुद्द राज ठाकरे यांनीच पकडले आहे प्रचार दौर्‍यासाठी कळंबोली मार्गे जात असताना, राज ठाकरेंना रस्त्याच्या कडेच्या पाईपलाईनमधून पाण्याची चोरी होताना दिसली.मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून, सर्रास ही चोरी होत होती. त्यावेळी राज यांनी गाडी थांबवून या चोरट्यांना पकडले. तसेच वाहून चाललेले पाणी कार्यकर्त्यांना बंद करण्यास सांगितले.

close