कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर चपलफेक करून मारहाणीचा प्रयत्न

July 25, 2016 4:42 PM0 commentsViews:

अहमदनगर – 25 जुलै : कोपर्डी अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्ये प्रकरणातल्या आरोपींवर अहमदनगर सेशन्स कोर्टाच्या आवारात हल्ला करण्यात आला. या आरोपींवर चपलफेक करून मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी या आरोपींना तातडीने गाडीत बसवून कोर्टाबाहेर नेलं. या झटापटीत एक महिली पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाली.kopardi_case3

कोपर्डी प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ आणि नितीन भैमुले या दोघा आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. दोघा आरोपींना कोर्टातून बाहेर आणल्यानंतर काही महिला कार्यकर्त्या दबा धरुन बसल्या होत्या. त्यांनी संतोष आणि नितीनवर हल्ला केला. या आरोपींवर चपलफेक रून या आरोपींना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत आरोपींना गाडीत बसवून कोर्टाबाहेर काढलं. यावेळी झालेल्या झटापटीत एक महिला कर्मचारीही जखमी झालीये. अहमदनगर कोर्टाने दोन्ही आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये. याआधीही या आरोपींवर अंडीफेक झाली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close