अखेर ‘त्या’ पीडित मुलीला गर्भपात करण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

July 25, 2016 5:08 PM0 commentsViews:

दिल्ली – 25 जुलै : बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलीये. पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात 24 आठवड्याचा गर्भ आहे. शिवाय या गर्भामध्ये व्यंग असल्याचं वैद्यकीय चाचणीत समोर आलं होतं. यासंदर्भात पीडित मुलीकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना मुलीला गर्भपात करण्याची कोर्टाने परवानगी दिलीये.Supreme court of india

मुंबईतील एका अत्यंत गरीब घरातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या प्रियकराने बलात्कार केला होता. या नराधमाने पीडितले धोका देऊन दुसरे लग्न केले. त्यामुळे या पीडित मुलीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिने अनेक ठिकाणी वैद्यकीय तपासण्या केल्यात. त्यात गर्भाला व्यंग असल्याचं स्पष्ट झालं. जर गर्भपात केला नाहीतर तिच्या जीवाला धोका असल्याचं निष्पन्न झालं.

2 जून 2016 ला डॉक्टरांनी गर्भधारणेला 20 आठवडे झाल्यामुळे या पीडित मुलीला गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे या पीडित मुलीने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेसी एक्ट 1971 नुसार 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यास मुभा होता. पण आता काळ बदलला असून 26 आठवड्यांनंतरही गर्भपात करता येऊ शकतं असं या पीडित मुलीनं याचिकेत म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी एक डॉक्टराची समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार गर्भामुळे या पीडित मुलीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं स्पष्ट केलं. सुप्रीम कोर्टाने हा अहवाल स्विकारत पीडित मुलीला गर्भपात करण्यास परवानगी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close