मराठवाड्यातील नेते होते आयसिस दहशतवाद्यांच्या टार्गेटवर ?

July 25, 2016 5:53 PM0 commentsViews:

25 जुलै : परभणी आणि कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या आयसिसच्या संशयितांकडून धक्कादायक माहितीपुढे आली आहे. मराठवाडा येथील राजकीय व्यक्ती आणि महत्वाच्या व्यक्ती तसंच, मुंबई पुण्यासारख्या शहरातील मोठे सण नासीर चाऊस आणि शाहिद खान यांच्या टार्गेटवर होते अशी माहिती सूत्रांनी दिलीये.isis_pune_ats

महाराष्ट्र आणि केरळ एटीएस टीमने कारवाई करत परभणी आणि कल्याणमधून आयसिसच्या संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. परभणीतून नासेर चाऊसला अटक करण्यात आलीये. त्यावेळी त्याच्या घरात स्फोटक वस्तूही जप्त करण्यात आल्यात. चौकशी दरम्यान चाऊसने धक्कादायक माहिती दिलीये. मराठवाड्यातील राजकीय नेते आणि महत्त्वाच्या व्यक्ती टार्गेट होत्या. तसंच रिमोट कारचा म्हणजे रिमोट चावीच्या साह्याने गाडी बंद केली जाते किंवा उघडली जाते त्याचा वापर करुन स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये स्फोट करुन घातपात घडवण्याचा या दोघांचा कट होता, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

यासाठी आयसिसने एक मोठी टीम तयार केल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. मराठवाड्यातील राजकीय नेते किंवा त्या महत्वाच्या व्यक्ती कोण? याचा शोध आता एटीएस घेत आहे. धक्कादायक म्हणजे शाहिद आणि नासीरच्या टीममध्ये मराठवाड्यातील आणखी 7-8 तरुण आहेत. ज्यांना आयसिसच्या सीरियातील कमांडरनं बॉम्ब बनवण्याचं आणि हल्ल्याचं प्रशिक्षण दिल्याचं समजतंय.

मराठवाड्याला आयसिसचा धोका?

- मराठवाड्यातल्या महत्त्वाच्या व्यक्ती आयसिसच्या रडारवर?
– मुंबई पुण्यातले मोठे सण आयसिसच्या रडारवर?
– रिमोट कारचा वापर करून घातपात घडवण्याचा कट?
– घातपातासाठी आयसिसनं मोठी टीम तयार केल्याची माहिती
– शाहीद आणि नासीरच्या टीममध्ये मराठवाड्यातले 7 ते 8 तरुण?
– सिरियातल्या आयसिसच्या कमांडरकडून बॉम्ब बनवण्याचं आणि हल्ल्याचं प्रशिक्षण?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close