रामदेव बाबांचं असंही ‘गोलासन’ !

July 25, 2016 6:03 PM0 commentsViews:

कधी योग करताना तर कधी कुस्तीच्या आखाड्यात दिसणारे योग गुरू रामदेवबाबा चक्क फुटबॉलच्या मैदानावर दिसले. विशेष म्हणजे रामदेवबाबा थेट मैदानात फुटबॉलला किक मारताना दिसले. स्वच्छ भारत मिशन आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाच्या समर्थनार्थ हा फुटबॉलचा सामना खेळवला गेला.

बॉलिवूडचे कलाकार आणि खासदारांमध्ये हा सामना रंगला ज्याला रामदेव बाबांनी रंगत आणली. मैदानावर रामदेवबाबा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरले होते. विशेष म्हणजे या अभियानाचे ब्रँड अँम्बेसेडर खुद्द रामदेव बाबा आहेत.

खासदारांच्या टीममधून बाबुल सुप्रियो, मनोज तिवारी तर बॉलिवूड कलाकारांच्या टीममध्ये अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, अर्जुन कपूर यांनी सहभाग घेतला. पण, बॉलिवडूच्या टीमवरही रामदेव बाबा भारी पडले एकाहुन एक गोल ते करत होते. त्यात सगळ्यात चांंगले प्रदर्शन अभिनेता रणबीर कपूर ने केले तर त्यांचा कोच अभिषेक बच्चन यांंनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close