‘कॅलिफोर्नियाच्या जंगलात अग्नितांडव’

July 25, 2016 8:49 PM0 commentsViews:

25 जुलै : कॅलिफोर्नियाच्या जंगलातल्या लागलेल्या आगीनं भीषण रूप धारण केलंय. गेल्या आठवड्यात लागलेल्या आगीनं तब्बल 20 हजार एकर जंगल व्यापलं आहे. वाढत असलेली आग आणि त्यामुळं प्रचंड धुराचे लोट निघत असल्यानं परिसरातल्या तीन हजार जणांना सुरक्षित
स्थळी हलवण्यात आलंय. अग्निशमन दल आणि वनविभागाचे 900 कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.विमानाच्या साह्यानंही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.गेली पाच वर्ष कॅलिफोनिर्यात दुष्काळ आहे. त्यातच आता जंगलाला आग लागल्यानं वनसंपदेचं प्रचंड नुकसान झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close