रॉयल चॅलेंजर्स आणि डेक्कन चार्जर्समध्ये सामना

April 8, 2010 10:56 AM0 commentsViews: 1

8 एप्रिलआयपीएलमध्ये आज एकच मॅच होणार आहे. ती म्हणजे बंगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि डेक्कन चार्जर्स दरम्यान. डेक्कन चार्जर्स टीमचे आव्हान जवळ जवळ संपुष्टात आले आहे. पण बंगलोरसाठी ही मॅच महत्त्वाची आहे. बंगलोरची टीम सध्या पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. मॅच बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर होणार आहे. त्यामुळे बंगलोर टीमला होम ऍडव्हांटेज असेल. पण प्रत्यक्ष मैदानावरची टीमची कामगिरी मागच्या आठवड्यात संमिश्र आहे. शेवटच्या लीग मॅचमध्ये दिल्ली टीमकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर चेन्नई टीमनेही त्यांना पराभवाची धूळ चारली आहे.डेक्कन टीमची स्थितीही फारशी चांगली नाही. राजस्थान टीमकडून त्यांचा दोन रन्सनी पराभव झाला आहे. आणि मॅचमध्ये डेक्कनला 160 रन्सचे लक्ष्यही गाठता आले नव्हते. शिवाय आणखी एका पराभवामुळे स्पर्धेतील त्याचे आव्हानही संपुष्टात येणार आहे. त्याचे दडपणही टीमवर असेल. आश्चर्य म्हणजे दोन्ही टीम या हंगामात पहिल्यांदाच आमने सामने येत आहेत.

close