…आणि वाघाने तिला खेचून नेलं

July 25, 2016 9:02 PM0 commentsViews:

25 जुलै : चीनच्या बीजिंगजवळच्या एका अभयारण्यातील धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. एक महिला जंगल सफारी दरम्यान गाडीतून खाली उतरली. पण गाडीच्या दुसर्‍याच बाजूने तिच्याकडे येणार्‍या वाघाकडे तिचं लक्ष गेलं नाही आणि त्या वाघाने तिच्यावर झडप घालत तिला खेचत नेलं. या महिलेच्या मागे वाघ असताना बाकी लोकांनी तिला सावधान करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या घटनेत या महिलेचा मृत्यू झालाय. जंगलात किंवा अभयारण्यात असताना तिथल्या नियमांचं पालन केले नाही तर काय होतं हेच आपल्याला सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेत दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close