नरसिंगच्या बचावासाठी मुख्यमंत्री फडणवीस आखाड्यात !

July 26, 2016 1:58 PM0 commentsViews:

narsing_yadav_cm_fadanvis26 जुलै : कुस्तीपटू नरसिंग यादव डोपिंग प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आखाड्यात उडी घेतलीये. नरसिंग यादव सारख्या खेळाडूवर अन्याय होत आहे असं भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय क्रीडामंत्र्यांना पत्र लिहिलंय.

रिओ ऑलिम्पिकच्या उंबरठ्यावर नरसिंग यादवला निलंबित करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात संशय व्यक्त केला असून अशा प्रकारांमुळे चांगल्या खेळाडूंना फटका बसत असून नरसिंग यादवला न्याय देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. नरसिंग यादव महाराष्ट्राचा आहे आणि त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे, असा मुद्दा विखे पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलं.

काय आहे प्रकरण ?

कुस्तीत भारताला नक्की ऑलंपिक मेडल मिळणार असं खात्रीनं सांगितलं जायचं त्याचं कारण आहे नरसिंग यादव. 74 किलो वजनी गटात नरसिंग भारताचं नेतृत्व करणं अपेक्षित आहे. डोपिंगनं त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्हं निर्माण केलंय.

ऑलिम्पिकची कुस्ती खेळण्याअगोदरच नरसिंग यादव सध्या दोन हात करतोय ते डोपिंगच्या आरोपाविरूद्ध. नरसिंगच्या डोपिंग टेस्ट पॉजिटीव्ह आल्यात. त्यामुळे त्याच्या ऑलिम्पिकवरच्या सहभागावर सध्या तरी प्रश्नचिन्हं आहे. सुशीलकुमारच्याऐवजी नरसिंग यादवचं रिओ तिकीट निश्चित झालं तेव्हापासूनच त्याच्याविरूद्ध वादळ उठत राहिलंय. त्याच्यावर हरियाणात प्रशिक्षणादरम्यान हल्ला होईल असंही सांगितलं जात होतं. त्यासाठी सुशीलकुमारवर संशय व्यक्त केला जायचा. आताही नरसिंग यादवनं कटकारस्थानाचा आरोप केलाय.

नरसिंग सध्या हरीयाणातल्या सोनीपतमध्ये कुस्तीची तयारी करतोय. यासाठी तो बल्गेरीयालाही काही दिवस जाऊन आला. त्यानंतर त्याच्या टेस्ट झाल्या. त्याच टेस्ट पॉजिटीव्ह आल्यात. विशेष म्हणजे त्याचा रूममेट असलेल्या संदीप यादवचीही टेस्ट पॉजिटीव्ह आलीय. त्यामुळे कटकारस्थानाची शक्यता बळावलीय.

नरसिंग यादव डोपिंग प्रकरणात खुद्द पंतप्रधानांनी आता लक्ष घातलंय. कुस्ती फेडरेशनही नरसिंगच्यासोबत उभं आहे. फक्त तो
ऑलिम्पिकला जाणार की नाही याबाबत सध्या तरी कुणीच खात्रीनं सांगत नाहीये. पण समजा नरसिंगचं जाणं थांबलंच तर मग मात्र भारत एका मेडलला हुकणार हे निश्चित.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close