दिल्लीत 4 वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष बलात्कार, नराधम अटकेत

July 26, 2016 2:16 PM0 commentsViews:

rapeदिल्ली, 26 जुलै : दिल्लीत 4 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराची संतापजनक घटना घडलीये. या प्रकरणी जुनैद नावाच्या नराधमाला अटक करण्यात आलीये.

शाहबाद डेअरी भागात काल दुपारी ही चिमुरडी खेळत होती. तिच्या शेजारी राहणारा जुनैद तिच्याकडे आला, आणि खाऊच्या बहाण्यानं तिला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्यानं तिच्यावर अत्याचार केले. तेवढ्यात मुलीची आई तिथे आली. या नराधमामं आईला ढकलून दिलं. आईनं आवाज उठवल्यावर स्थानिक लोक तिथे जमा झाले. त्यांनी जुनैदला चांगलाच चोप दिली, आणि पोलिसांकडे सोपवलं.

मुलीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केलं गेलं. या मुलीच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा करण्यात आल्यात. तिला इतकी गंभीर दुखापत झाली होती, की तिला टाके घालावे लागले आणि तिच्या वेदना कमी करण्यासाठी भूल द्यावी लागली. या घटनेचा तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. जुनैदवर बाललैंगिक अत्याचाराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close