घुसखोरी करणार्‍या 4 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जिवंत पकडला

July 26, 2016 2:25 PM0 commentsViews:

jammu terrsit ded26 जुलै : कारगिल विजय दिनानिमित्त एकीकडे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करीत असताना दुसरीकडे सीमरेषा ओलांडून घुसखोरीच्या प्रयत्नात असणार्‍या चार दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलंय.

जम्मू-काश्मिरमधील कुपवाड येथे घुसखोरी करणार्‍या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे..तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आल्याचं समजतं आहे.

हे पाचही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी गस्त घालणार्‍या जवानांची त्यांच्यावर नजर पडली. त्यानंतर त्यांच्यात चकमक सुरू झाली. यामध्ये चौघांना ठार करण्यात आलं. तर एकाला जिवंत पकडण्यात आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close